खासदार होऊन देखील प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य बालिशपणाचे : नरेंद्र काळे

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मेळावे आखले जात आहे. असाच एक मेळावा शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातील जुळे सोलापूर येथील जागगुंडी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपाला सोलापूरात दंगल घडवून आणायची होती असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता.
या आरोपा नंतर भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आरोप खोडून काढत, नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. जातीय दंगल घडवून आणण्याचा डाव होता हे आपल्याला माहिती होतेचं तर तशी तक्रार का केली नाही.? आता असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे. म्हणजे प्रचारा दरम्यान प्रणिती शिंदे यांना दंगल अपेक्षित होती का अस म्हणत नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्या पलटवार केला.
भाजपा ही अतिरेकी वृत्तीची आहे असा आरोप देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असतात शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारानी भाजपाच्या उमेदवारास भरभरून मताधिक्य दिली, हि सल खासदार प्रणिती शिंदे यांना बोचती आहे, म्हणून तर असे बेताल वक्तव्य प्रणिती शिंदे ह्या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली.
मागील तीन पराभवानंतर मिळालेल्या एका विजया नंतर खासदार प्रणिती शिंदे ह्या इतक्या होरपळून गेल्या आहेत की त्यांच्या नुसता अहंकार दिसून येत आहे. कदाचित याच कारणामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टिका करताना म्हणाले.
काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या आरोप, प्रत्यारोपानंतर हा वाद, आता नक्की कुठपर्यंत जाणार, काँग्रेसचे नेते भाजपाच्या अध्यक्षांना काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.