संभाजी ब्रिगेड संवाद मेळावा बैठक संपन्न, वाशी येथील अधिवेशनाला सोलापुरातून शेकडो कार्यकर्ते जाणार

सोलापूर : प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्हा कार्यकारिणी संवाद बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे उत्साहात पार पडली छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २२ ऑगस्ट २०२४ रोजी नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे पार पडणार आहे याबाबत या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत अधिवेशनाच्या नियोजन संदर्भात चर्चा करून सोलापूर शहर व जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थीत राहणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी दिली. सदर बैठकीस प्रदेश संघटक प्रदिप कणसे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, महिला आघाडी शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, माधुरी चव्हाण आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी छत्रगुण माने, जिल्हा संघटक पदी राकेश डोंगरे, मोहोळ तालुकाध्यक्षपदी सुधीर नीळ, जिल्हा सचिव पदी दत्तात्रय डिंगणे तर शहर कार्याध्यक्षपदी सिताराम बाबर, शहर उपाध्यक्ष पदी फिरोज सय्यद, शहर संघटक पदी रमेश चव्हाण, शहर प्रसिद्धीप्रमुख पदी मल्लू भंडारे, शहर संघटक पदी तेजस शेळके, शहर संघटक शिवाजी भोसले, शहर सहसचिव अरविंद मस्के, महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख पदी माधुरी चव्हाण आदींची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, लखन गायकवाड, आर्यन कदम, ओमकार कदम, विजय बिल्लेगुरु, आनंद शेवगार, मल्लिकार्जुन शेवगार, अमोल सलगर, दीपक जाधव, संतोष माशाळकर, अमोल सलगर, गौतम चौधरी, विजय माने, नंधु घाडगे, नरेश गंजे, सागर माने, शिवा व्यवहारे, दिलीप पाटील, राजू बुगल, महेश गायकवाड, संभाजी माने अदी उपस्थित होते.