सभेत शरद पवारांना दाखवले काळे झेंडे, एक मराठा लाख मराठा च्या दिल्या घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीतील दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे येथे लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्ता उतरत शांततेत शांतता रॅलीत सहभागी होत आहे.
जाहीर सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आपली भूमिका मांडत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे याची धग महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना सोसावी लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अनेक ठिकाणी मराठा बांधव अडवून मराठा आरक्षणा विषयी जाब विचारत आहेत.
असाच प्रकार बार्शी येथील शरद पवारांच्या शेतकरी मेळाव्यात पाहावयास मिळाले. मराठा आरक्षणाचे आंदोलक सभेमध्ये येऊन काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत मराठा आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. मराठा युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.