अमित शहा यांना त्वरित निलंबित करून संविधान अपमानाचा गुन्हा दाखल करा : अजित बनसोडे

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे एकमंत्री अमित शहा, राष्ट्रपुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी संसदेमध्ये अत्यंत घृणास्पद व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्र पुरुषाचा अपमानाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना संसदेतून निलंबीत करण्यात यावे. अशा मागणीची निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी नायब तहसिलदार (ग्रह शाखा) बालाजी बनसोडे यांना देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत तसेच भारतरत्न सन्मानप्राप्त राष्ट्रपुरुष आहेत. अशा महामानवा बद्दल सन्मानजक भाषा वापरणे बंधनकारक आहे. मात्र अमित शहा यांनी संसदे मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा उल्लेख अत्यंत घृणास्पद व अपमानास्पद पध्दतीने केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांनाच नव्हेतर जगातील सन्मानजनक व्यक्तिमत्व आहेत. परंतू राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ व भा.ज.पा. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांनी लिहीलेले संविधान मान्य नाही. हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. अमित शहा यांचे वक्तव्य संविधानिक नैतीकता, संसदीय लोकशाहीच्या मर्यादांचा भंग करणारे आहे. यामुळे त्यांना त्वरीत निलंबीत करावे. त्यांच्यावर संविधानाच्या अपमानाचा गुन्हा दाखल करुन कडक शासन करण्यात यावे.
अमित शहा यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास समस्त आंबेडकरी समाज लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. त्यास पुर्णपणे शासन जबाबदार राहील यांची नोंद घेण्यात यावी असा इशारा सम्यक क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष अजित बनसोडे यांनी निवेदना वेळी दिला.
निवेदन देतेवेळी सम्यक क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष अजित बनसोडे, पंकज ढसाळ, प्रीतम जाधव, अमीर मुजावर, उमेश चव्हाण, शिवानंद भणगे, दिगंबर वाघमारे, अनिल बनसोडे, आदी उपस्थित होते.