आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णसेवा देणाऱ्या सद्भावना धर्मशाळा न्यायाच्या प्रतीक्षेत, अल्पदरात रुग्णसेवा देणाऱ्या संस्थेचाही विचार व्हावा
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथिल सद्भावना धर्म शाळा तातडीने न पाडता त्याची पर्याय व्यवस्था करावी : दिव्यकांत गांधी

सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या ३० वर्षापासून रूणांच्या नातेवाईकांना राहण्याच्या सोईसाठी सद्भावना धर्मशाळा, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय आवारामध्ये असून विना अनुदानावर चालविण्यात येते. तसेच असंख्य रोप लावून आम्ही बनविलेल्या भारत नकाशा बागेची सुधारणा करावी.
रूग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडून जा.क. श्रीछशिमसरूसो / बांवि/धर्मशाळा ५३६७-७०/२०२४ दि.८/४/२०२४ या पत्राद्वारे धर्मशाळा रिक्त करण्याबाबत आदेश दिले. व धर्मशाळा पाडण्याचे आदेश अधिष्ठाता यांनी, कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग यांना जा.क. श्रीछशिमसरूसो/वांवि/४५८५/२०२४दि.५/४/२०२४ पत्राद्वारे दिले आहे.
रूग्णालयात उपचार घेण्यास आलेल्या रूग्णाची काळजी घेण्यास आलेल्यांना ३० वर्षापासून राहण्याची सोय असलेल्या धमशाळेला तातडीने पाडून ट्रॉमा युनीट इमारत बांधण्याचा निर्णय योग्य वाटत नाही. पूर्व कल्पना पण दिली नाही तसेच पर्यायी व्यवस्था केली नाही ती करावी अशी मागणी दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.
धर्म शाळेतील कार्यकर कर्मचारी यांनी ३० वर्षे काळजी घेऊन, अत्यल्प फी मध्ये गरजुंच्या राहण्याची सोय, आपुलकीने केली आहे, या कर्मचार्याची कदर होणे गरजेचे आहे धर्मशाळा बंद झाल्याने, कर्मचार्याच्या रोजगारीचाही मोठा प्रश्न आहे तसेच गरजूंना राहण्यासाठीची व वाथरूमची फार गैरसोय होणार आहे. याचा विचार होऊन न्याय देण्याची मागणी गांधी यांनी केली. या पत्रकार परिषदेस उमा तीकोटी, जया भंडाल, सविता ताकतोडे, मुत्तम्मा मेत्रे, गणेश खेडकर, प्रकाश लोढा, नारायण छाब्रीया आदी उपस्थित होते.