
सोलापूर : प्रतिनिधी
धनश्री नागेश जाधव रा.शिरापूर,ता.मोहोळ, जि. सोलापूर हीचा खून केल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेत पती नागेश शिवाजी जाधव रा.शिरापूर,ता.मोहोळ, जि. सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती भारती डांगरे व मंजुषा देशपांडे यांनी अपिलात जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, मयत धनश्री व आरोपी नागेश यांचे लग्न घटनेपूर्वी केवळ 14 महिने आधी झाले होते. लग्नानंतर सासू सासरे व पती हे मयत धनश्री हिस तू आमच्या लायकीची नाही असे म्हणून घरातून हाकलून दिले. त्यानंतर पोलिसांनी बोलावल्यानंतर आरोपीने मयतास नांदण्यास घेऊन गेला. तरीदेखील आरोपी हे तू आमच्या लायकीचे नाही म्हणून मारहाण करीत होते. दि:-1/6/2014 रोजी मयत ही तिच्या खोलीत असताना तिचे सासू सासरे व पतीने तिस अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले, उपचारा दरम्यान मयत धनश्रीने मृत्यूपूर्व जबाबात सासू सासरे व पतीने जाळून मारल्याबाबत कथन केले होते, त्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा खटला हा सोलापूर सत्र न्यायालयात चालला असता, न्यायालयाने आरोपी नागेश जाधव यांस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
सदर शिक्षेविरुद्ध आरोपी नागेश याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, सदर अपीलामध्ये जामीन मिळण्याचा अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, साक्षीदारांच्या व मृत्युपूर्व जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपीस 25,000- जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ए. ए. टक्कळकर यांनी काम पाहिले.