आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रा शिवाजी सावंत यांची मध्यची मोर्चे बांधणी, शिबिराचा हजारो गरजूंनी घेतला लाभ

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना सोलापूर शहर-जिल्हाच्या वतीने माधव नगर, ७० फूट रोड, शहर मध्य सोलापूर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
१० हजाराहून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्य चाचण्या करून औषधपचार घेतले, याप्रसंगी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख नाना मस्के, हरिभाऊ चौगुले,
सुनील निंबाळकर, राजकुमार शिंदे, सायबांना तेगगेळी, समर्थ मोटे, गफूर शेख, नवनाथ चव्हाण, अनिकेत राठोड, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, डॉक्टर, कर्मचारी आदी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात बालरोग तपासणी, विविध आजारांची तपासणी, दात नाक कान घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, स्त्री रोग तपासणी, त्वचारोग तपासणी, हृदयाची तपासणी, इसीजी ब्लड प्रेशर तपासणी, मेंदूच्या विविध तपासण्या, शुगर तपासणी, ऑक्सिजन लेवल तपासणी,
आवश्यक रक्त चाचण्या यासह विविध प्रकारच्या आजारांचं चाचणी करून त्यावर योग्य ते औषध देण्यात आले. एकंदरीतच या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शिवसेना सह संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपल्या मध्याची मोर्चे बांधणे जोमात सुरू असल्याची चर्चा शिवसैनिकात सुरू होती.