क्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर

सोलापूर बार असोसिएशन तर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

सोलापूर : प्रतिनिधी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करत वकिली शिक्षण पूर्ण केले. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सन 1996 पासून वकिली व्यावसायास सुरवात केली तसेच सोलापूर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व खजिनदार म्हणून काम पहिले. शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात अभुतपूर्व यश मिळवले सहा वर्षाच्या जिल्हा सरकारी वकील कार्यकाळात 100 जन्मठेप व दोन फाशी शिक्षा पोहोचवण्याचा विक्रम केला व सोलापूर बार असोसिएशनची नावलौकिकता वाढवली वकिली व्यवसायासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जिल्हा सरकारी वकील यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देखील घडविले. त्यांचा कार्याचा दखल घेवून व वकिली व्यावसाय करणाऱ्या बंधु बघीनींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सोलापूर बार असो वतिने जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदिपसिंघ राजपुत यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदरचा सन्मान सोलापूर बार असो चे अध्यक्ष ॲड अमित व्हि आळंगे, उपाध्यक्ष ॲड व्हि पी शिंदे , सचिव ॲड मनोज पामुल , खजिनदार ॲड विनय कटारे यांचा वतिने करण्यात आला.

सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अमित आळंगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्हा सरकारी वकील ॲड राजपूत सरांचे गरीब वंचित घटकांना न्याय देण्यासाठी फार मोठा योगदान लाभला आहे. आज तागायात असंख्य विद्यार्थी घडवणारे सामाजिक जाण असणारे राजपुत सरांचा सत्कार करताना आम्हास आनंद होत आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ ॲड महेश अग्रवाल, ॲड व्ही एस आळंगे, ॲड शैलजा क्यातम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठविधीज्ञ ॲड महेश अग्रवाल यांनी माननीय राजपूत सरांच्या हातून अशीच देशसेवा व समाजसेवा घडावी अशी शुभेच्छा दिली.

ज्येष्ठविधीज्ञ ॲड व्ही एस आळंगे यांनी माननीय राजपुत सरांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात नावलौकिक केले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असे मत व्यक्त केले.

साह्य. सरकारी वकिल ॲड शैलजा क्यातम म्हणाले कि अतिशय प्रतिकुल परिस्थित सरांनी प्रामाणिक पणे काम पाहून अन्याय झालेल्या कुटुंबाना न्याय देण्याचे काम केले असे मत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी सांगितले कि, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानाशी लढलो व प्रामाणिकपणे काम करीत राहिलो म्हणूनच मला समाजातील अन्याय झालेल्या कुटुंबांना न्याय देता आले. ज्या कुटुंबात माझ्या वकिली व्यवसायास सुरुवात केलो त्या कुटुंबाने म्हणजेच सोलापूर बार असोसिएशनने माझ्या कार्याची दखल घेऊन माझा सन्मानपत्र देऊन गौरव केला म्हणून सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व वकील बांधवांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमास जेष्ठ विधिज्ञ ॲड हिरालाल अंकलगी, ॲड सुनिल शेळगीकर, ॲड खतीब वकिल, ॲड लक्ष्मण माराडकर, साह्य. सरकारी वकिल ॲड माधुरी देशपांडे, ॲड अल्पना कुलकर्णी, ॲड सौ बुजरे, ॲड शितल डोके, ॲड प्रकाश जन्नु, ॲड आनंद कुर्डुकर, सौ बागल सह असंख्य वकिल बंधु बघिनी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात सन्मान पत्राचे वाचन खजिनदार ॲड विनय कटारे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड मनोज पामुल व आभार प्रदर्शन सह सचिवा ॲड निदा सैफन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!