आबा सावंत उत्कृष्ठ संघटक, हिंदुत्वाची कास धरून हिंदू धर्म वाढवावा, भगवा शेला संस्थेतील गणेश पूजन

सोलापूर : प्रतिनिधी
भगवा शेला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची एकजूट चांगली आहे. या सर्वांनी संघटित राहावे. हिंदुत्वाची कास धरून त्यांनी हिंदू धर्म वाढवावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी केले. लक्ष्मीनगर, बाळे येथील श्री गणेशाच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूरच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले.
यावेळी भगवा शेला संघटनेचे संस्थापक परमेश्वर सावंत यांनी, यापुढेही संघटित राहून एकमेकांच्या अडीअडचणी सोडविण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांचा सन्मान केल्यानंतर, त्यांनी आबा सावंत व बाळे परिसरातील लोकांनी भरभरून प्रेम दिले. या प्रेमाची उतराई आपण कोठेही भरून काढू शकत नाही, असेच प्रेम माझ्यावर राहू द्यावे असे सांगत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना शहर उपप्रमुख दीपक दळवी, नाना मोरे, गणेश भोसले, विश्वास चव्हाण, सुनील सुरवसे, शक्तिसागर सुरवसे, विशाल पाटील, संजीव सुरवसे, सुरेखा गायकवाड, रंजना सावंत आदी उपस्थित होते.