सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पिंक वॉल सिग्नेचरच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणीने सही करून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृतज्ञापर मानले आभार

महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी योजना राबविली : किसन जाधव

सोलापूर : प्रतिनिधी

अख्या महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलाही सक्षम झाली पाहिजे. महिला स्वतः करिता काही करत नाही ही भावना मनात बाळगून त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनांची घोषणा त्यांनी केली. या योजनेस लाडक्या बहिणीने देखील उस्फूर्त प्रतिसाद दाखवत या योजनेचा त्यांनी लाभ घेतला थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावर रक्कम जमा झाले.

केवळ आणि केवळ फक्त अजित पवारांमुळे ही योजनेला चालना मिळाली सर्वाधिक योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना दिली. दरम्यान रेल्वे लाईन्स, सोनामाता शाळेसमोरील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंक वॉल च्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणीने आपली सही करून अधिक पवारांचे कृतज्ञतापर आभार मानले आणि यावेळेस लाडक्या बहिणींचा अजित पवार हेच लाडके भाऊ अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या.

या प्रसंगी किसन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, लक्ष्मी पवार, शोभा गायकवाड, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड, मीना जाधव, मारता आसादे, सरोजनी जाधव, पुष्पा नाईकवाडी, लता भोसले, हिराबाई शेख, मालती साळुंखे, सफिया शेख, मोनिका रेशमा सोनवणे,

श्रीदेवी सोनवणे, बेलदारे, विदर्शना वाघमारे, सुनीता यमकोटे, संतोषी मिसाळ, सुनिता होटकर, सुलोचना हांडे, मोहिनी पवार, वैशाली सोनवणे, प्रभावती सोनवणे, कविता कदम, राजश्री सोनवणे, जयश्री कदम, सोनाली नारायणकर, श्रीदेवी सोनवणे, विजयमला सोनवणे, केसरबाई शिंदे, सुनंदा होटकर, कमल नारायणकर, स्वाती शिंदे, लता सोनवणे, प्रियंका जगताप यांच्यासह शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली होती.

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची साथ देणारे अजित पवार हेच लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ असून गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने दीड हजार रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे हे अनेकांना माहित नाही अजित पवारांनी राबवलेली ही योजना आमच्या दृष्टीने खूप महत्वकांक्षी योजना असून या योजनांचा लाभ देखील समस्त राज्यातील लाडक्या बहिणीने घेतला

या निमित्त ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेमुळे सर्वसामान्य महिलाही आर्थिक सक्षम झाली त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृतज्ञतापर आभार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर म्हणाल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभावीपणे राबविली महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन अजित पवारांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात अमलात आणली.

या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाले असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या कडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनसह इतरही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यापुढेही कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापर आभार मानण्यासाठी आज आपल्या कार्यालया समोर वाॅल पिंकच्या माध्यमातून सह्या करून आपला आनंद द्विगुणित केला असेही ते म्हणाले. यावेळेस राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!