पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रा तालीम ची ऐतिहासिक परंपरा कुस्तीपटू आणि लेझीमचे केले कौतुक

सोलापूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रा तालीम गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येतो, याची प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रभर सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली.
खऱ्या अर्थाने सोलापुरातील मानाचा पणजोबा गणपती म्हणून पत्रा तालमीच्या गणपतीला मानाचे स्थान आहे.
लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि पत्रा तालीम च्या मानाच्या पणजोबा गणपतीची अखेरची पूजा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे देखील उपस्थित होते.
या वेळी पत्रा तालमीचे खलिफा दत्तात्रय कोलारकर, माजी उपमहापौर पद्माकर काळे, महेश गादेकर, श्रीकांत घाडगे, राजन जाधव, नागनाथ बन्ने, बापू जाधव, राजाराम दुधाळ, मनोज गादेकर यांच्यासह ज्येष्ठ उपस्थित होते.
मानाच्या पणजोबा गणपतीचे पूजन झाल्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉ किरण देशमुख आणि पत्रा तालीम मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बन्ने यांच्या हस्ते मानाची शाल आणि गणरायाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर एम राजकुमार यांनी पत्रा तालीम ची पाहणी केली आणि तालमीत कुस्ती खेळणाऱ्या युवकांची माहिती घेतली. पत्रा तालमीतील बजरंग बली चे दर्शन देखील घेतले.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रा तालीम ची परंपरा, भव्य लेझीम आणि कुस्तीपटूंचे कौतुक करत यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी गणराया चरणी प्रार्थना केल्याची माहिती दिली.
यावेळी पत्रा तालीम युवक मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बन्ने यांनी मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणारा देखावा आणि मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी पत्रा तालीम गणेशोत्सव मंडळाचे नूतन अध्यक्ष पै नवनाथ बन्ने, पिंटू चव्हाण, बाबूभाई बनसोडे, पेजर चव्हाण, आनंद कोलारकर, पिंटू इरशेट्टी, पै अभिजीत दुधाळ
सचिन स्वामी, प्रकाश काळे, सुरज पाटील, विजय कांबळे, सुहास चाबुकस्वार, निलेश शिंदे, किशोर गादेकर यांच्यासह पत्रा तालीम युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.