सचिन कवले यांचा होलार समाज बांधवाकडून सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा समाजकल्याण अधिकारी व जात पडताळणी समिती सदस्य सचिन कवले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा होलार समाजातील बांधवाकडून सत्कार करण्यात आला. सचिन कवले यांच्या हातून सर्व समाज बांधवांना न्याय मिळो, कोणाची ही काम थांबू नये असे मत व्यक्त करत चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी होणार समाज नेहमी ठामपणे उभा असतो. कोणते ही संकट आल तर न डगमगता निधड्या छातीने होलार समाज उभा असतो. चांगल्या कामाचे कौतुक हि करतो आणि चुकत असेल तर त्याला सांगण्याची हिंमत देखील समाजामध्ये आहे. असे म्हणत समाज बांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ॲड. डि.एन.भंडगे, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नवनाथ भजनावळे, संस्थापक अध्यक्ष भाऊ प्रतिष्ठान सचिन हेगडे, अमोल आयवळे, डोणगाव ग्रा.पं.सदस्य नितीन हेगडे, सिदराम जावीर, जकु हेगडे, युवा नेते राजाभाऊ निकम, गिरीश माळी व समाज बांधव उपस्थित होते.