जरांगे पाटलांचं नाव घेऊन दुकानदारी करत महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणाऱ्या माऊली पवार यास जशास तसे उत्तर देऊ : अमोल शिंदे
मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळू म्हणणाऱ्यांचे कपडे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी फाडतील : दिलीप कोल्हे

सोलापूर : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सोलापूरला येणार आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने त्यांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनात तातडीने मार्ग काढावा याबाबतचे निवेदन देण्यात येईल अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जरांगे पाटील गेल्या चार दिवसापासून उपोषण करत असून त्यांची प्रकृती ढासळत आहे. शासनाने त्यांच्या या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यापूर्वीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व समावेशक असं काम केलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूरला येत असताना त्यांना सोलापुरात पाय ठेवून दिला जाणार नाही अशी बल्गना माऊली पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही काँग्रेसच्या स्थानिक युवकांनी केली आहे.
ही कृती समर्थनीय नाही. महाविकास आघाडीचा अजेंडा मराठा समाजाचे काही कार्यकर्ते काँग्रेस पुढाऱ्यांच्या पाठिंब्याने राबवत आहेत. महिलांच्या कार्यक्रमासाठी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांना कोणी अडवण्याची भाषा करत असेल तर महिला भगिनी आणि आम्ही कार्यकर्ते हे सहन करणार नाहीत. माऊली पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अडवूनच दाखवावं.
घोषणा करायच्या आणि अटक करून घ्यायची असा या मागचा प्रसिद्धीस्टंट करण्याचा हेतू आहे. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊ नये. मोकळच ठेवावं. हे पाहूया त्यांची कितपत हिंमत होते. अशी खिल्ली ही यावेळी उडवण्यात आली. या पत्रकार परिषदेस अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, दास शेळके, अनंत जाधव, शशी थोरात आदी उपस्थित होते