संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
श्री संत गाडगेबाबा यांच्या १४९ व्या जयंती दिना निमित्त सोलापूर मधील सात रस्ता येथे सोलापूर जिल्हा परिट (धोबी) सेवा मंडळ तसेच सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर या सर्वांच्या वतीने आणि या संघटनेचे सोला-पूर जिल्हाध्यक्ष अजय नवनाथ सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळची दहा वाजता संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे सात रस्ता परिसर संगमेश्वर कॉलेज विश्रामगृह आदी परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात आली, दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सुरु होते.
समाजबांधव राहुल चव्हाण यांच्याकडून लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव वाघमारे, शांतीलाल कारंडे, अनिल हुपरीकर, राहुल काटकर, पत्रकार विशाल भांगे, महेश माने, गणेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर,
जिल्हा संपर्क प्रमुख विनोद भोसले, जिल्हा समन्वयक दत्तात्रय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्षा महादेव घोडके, उत्सव अध्यक्ष संतोष घोडके, सचिव पिंटू काटकर, कार्याध्यक्ष सोमनाथ काटकर, खजिनदार सचिन मस्के, उपाध्यक्ष बालाजी काटकर आदी उपस्थित होते.