अखेर 10 व्या दिवशी आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन स्थगित, मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर निर्णय

सोलापूर : प्रतिनिधी
आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन अखेर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. याबाबतची अधिकृत माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी स्वतः दिली.
आमदार राऊत यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष अधिवेशनाची मागणी वगळता इतर मागण्या मान्य करण्याबाबत बैठक लावू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण, हैद्राबाद गॅझेट तसेच सगेसोयरे जीआरला हरकती आल्याने याला विलंब लागणार आहे. या मागण्यासाठी शिंदे समिती काम करत असून त्याबाबत सरकार नक्की विचार करेन असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांना दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.