MPDA.. मोहसीन सलीम नदाफ उर्फ DK मोहसीन एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द
खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण करणे व फसवणुक करणारा मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी.के, वय ३६ वर्षे, रा.प्लॉट क्र.१३. शास्त्री नगर, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशिर जमाव जमवून गैरकृत्य करणे, घातक हत्यारे बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, जमाव बंदी आदेशाचा भंग करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.
मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२० मध्ये कलम ५६(१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये, सन २०२२ मध्ये क. ११० (ई) (ग) फी.प्र.सं अधिनियमानुसार, सन २०२४ मध्ये क. १०७ फौ.प्र. सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, २२ ऑगस्ट २०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास २८ ऑगस्ट २०२४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.
हि कारवाई एम. राज कुमार, पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्द्र अजित लकडे, वपोनि, सदर बझार पोलीस ठाणे, भालचंद्र ढवळे, पोनि, सदर बझार पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.