मु पैलवान यांच्या सामाजिक कार्याचे अनुकरण आजच्या युवकांनी करावे : विजयकुमार देशमुख (आमदार, भाजप)

सोलापूर : प्रतिनिधी
पत्रा तालिमचे संस्थापक मुरलीधर बहादुरजी घाडगे उर्फ मु पैलवान यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त पत्रा तालीम येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रारंभी मु पैलवान यांच्या प्रतिमेस माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद नंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहा वाजता सुरू झालेले रक्तदान मोठ्या उत्साहात युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदवत ६५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, पत्रा तालीमचे खलिफा दत्तात्रय कोलारकर, पद्माकर काळे, राजू जोशी, शिवाजी चव्हाण, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, गणेश शेळके, दत्ता बनसोडे, लहू गायकवाड, सचिन शिंदे, पिंटू इरकशेट्टी, आनंद कोलारकर, व्यंकटेश पवार, तम्मा गुडुर, सुहास कोलारकर, सचिन स्वामी, अमृत भुरळे, गणेश भुरळे, सुरज भोसले, निलेश शिंदे, शेखर सातपुते, ओम घाडगे, आदित्य घाडगे, मयुरेश घाडगे, आदीं उपस्थित होते.
यावेळी पत्रा तालीम युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँकेचे प्रमुख उदय पाटिल आणि त्यांच्या टिमचे सहकार्य लाभले.