फक्त लढ म्हणा, आता ‘शहर मध्य’चे संपूर्ण परिवर्तन हाच ध्यास, मनिष काळजे जोमात
ध्यास परिवर्तनाचा सोलापुर मध्यच्या सर्वागीण विकासाचा, महाराष्ट्रात नाव गाजेल असा आदर्श विकास करून दाखवू : मनिष काळजे

सोलापूर : प्रतिनिधी
परिवर्तनाचा ध्यास घेऊन मैदानात उतरल्या नंतर कष्ट होतच नाहीत. गरज असते ती फक्त लढ म्हणणाऱ्या पाठीराख्यांची, असे म्हणत शिवसेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांनी पत्राद्वारे हितगूज साधण्याचा प्रयत्न केला, हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
पत्र आहे खालील प्रमाणे..
आपण काय काय करू शकलो आहोत आणि काय काय करणार आहोत ते विशद करण्याचा आहे. हे करत असताना घरच्याच एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याची भावना मनात दाटली आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण करायचीच हे संस्कार आदरणीय बाळासाहेबांनी बिंबवले. धर्मवीर आनंदजी दिधेंनी वर्तनातून दाखवून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर चालता बोलता आदर्शच आहेत त्याबाबतीत आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा तुमचा पाठींबा आणि एकनाथजींचे आशीर्वाद यामुळे आत्तापर्यंत आपण सोलापूर शहरात ५० कोटींपेक्षा जास्त निधी विकास कामांवर खर्च करू शकलो आहोत. भविष्यात यापेक्षाही अधिक निधी आपण आणू हा विश्वास मला नक्की आहे.
उदाहरणादाखल सांगायचे झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून आत्तापर्यंत सोलापूर मध्य मधीलच शेकडो जणांना आपण वैद्यकीय सहाय्यता करू शकलो आहोत. पुन्हा एकदा तुमचा माझ्यावरील विश्वासच इथेही कारणीभूत ठरला आहे. अर्थात समाजकार्य करणे म्हणजे गटारात उतरून घाण साफ करण्यासारखेच असते. कपड्याला चिखल लागतोच. त्याचप्रमाणे माझ्यावरही केवळ माझ्या कामांमुळे स्वतःची खुर्ची डळमळीत होते आहे हे पाहून खोटेनाटे आरोपच नाही तर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद यावेळी कामी आले. आपल्या सत्याच्या बाजूचाच विजय झाला.
आपल्या आजवरच्या नात्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे! ती म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोलापूर मध्यचा नुसता विकासच नाही तर संपूर्ण कायापालट करण्यासाठी झटत राहणार याचा कृतनिश्चय झाला आहे! आता गरज आहे ती फक्त आजवर जसे तुम्ही मला प्रेमाने, आपुलकीने, हक्काने ‘लढ’ सांगत आलात तसेच ‘तू लढ’ आम्ही आहोत पाठीशी म्हणण्याची ! तुमचे आशीर्वाद आजपर्यंत ज्या खंबीरतेने माझ्या पाठीशी आहेत तसेच आजही असतील तर विजयश्री खेचून आणणे आपल्यासाठी अत्यंत सोपे आहे.
एका अति सामान्य शेतकऱ्याच्या परिवारातील मुलाला आपण खूप मोलाची साथ दिली आहे ! याची नक्कीच परतफेड होऊ शकत नाही परंतु कर्तव्य म्हणून मी नक्की प्रयत्न करेन !! तुम्ही आणि मी मिळून सोलापूर मध्य बदलून टाकू हा माझा शब्द तुम्हाला देतो असे म्हणत शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी शहर मध्य मधील नागरिकांना भावनिक भाग देत आव्हाने केले आहे हे पत्र फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सह सोशल साइटवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.