11 ऑगस्ट रोजी सोलापूरात राजपुत समाज वधु – वर परिचय मेळावा

सोलापूर : प्रतिनिधी
राजपुत समाज वधुवर सुचक मंडळ यांच्या तर्फे रविवार दि 11 ऑगस्ट 2024 रोजी मुरारजी पेठ येथील राघवेंद्र स्वामी मठाजवळ सुशिल रसिक सभागृह येथे सकाळी 9 ते दुपारी 4.00 यावेळेत पहिले राज्यस्तरीय राजपुत वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष प्रतापसिंह चौहान यांनी केले आहे.
या मेळाव्यात राजपुत समाजातील विवाह योग्य युवक युवतीने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या मेळाव्या निमित्त वधु वर परिचय पुस्तिका ही प्रकाशित करण्यात येणार असून त्याचे राज्यभर वितरण होणार आहे. या मेळाव्याचा उद्देश वेळेची व पैशाची बचत व्हावी हा आहे. या परिचय पुस्तिकेत समाजातील उच्च पदावर असणा-या व्यक्तीनी व व्यवसायींकांनी शुभेच्छापर जाहिरात कंरुन सहकार्य करावे.
सोलापूर राजपुत वधु वर सुचक मंडळ सोलापूर समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर शाखा दत्त चौक, खाते क्रमांक 3010 IFC Code SBL50000001 या खाते क्रमांकावर परिचय पत्रिका रजिस्ट्रीशन शुल्क 600/- रु रोख अथवा डिमांड ड्राप्ट NEFT / RT GS द्वारे मेळाव्या साठी परिचय पत्र (बायोडाटा) जमा करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2024 आहे. मेळाव्यासाठी नोंदणी करणा-या युवक युवतीसह परिवारातील सदस्यांसाठी आसन व्यवस्था परिचय पुस्तिका सकाळी 9 ते 11 चहा नाष्टा दुपारच्या जेवणाची व्यवस्था
तसेच पत्रिका बघडण्यासाठी ब्राम्हणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच दोन कॅमेरा, दोन स्क्रीन, व मुला मुलींच्या माता पितांना बातचित करण्यासाठी स्वतंत्र खोलीमध्ये व्यवस्था संयोजकानी केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेस सोलापूर राजपूत समाज वधुवर सुचक मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंग चौहान, अमितसिंग पवार, उज्वल दीक्षित, सुरजसिंग चव्हाण, बालाजी पवार आदी उपस्थित होते.
या मेळाव्यास राजपुत युवक युवतींनी व पालकांनी वधु वर घटस्पोटीत, विधवा, मुला मुलींनी देखील सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 9422459204 / 9975238999 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन संयोजकांनी केले आहे.