शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची आर्थिक भरपाई द्या, अन्यथा 30 सप्टेंबर रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी (बार्शी)
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने फळबाग शेती पिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे फळबाग शेतीचे पंचनामे आदेश करून नुकसान भरपाई मिळावे अन्यथा फळबाग शेतकरी सह शेतकरी संघटना 30 सप्टेंबर 2024 रोजी बार्शी धाराशिव रोडवर मौजे चिखर्डे येथे भव्य रस्ता रोको आंदोलन छेडणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर यांनी दिली.
बार्शी तालुक्यात सतत पडत असलेल्या अतिवृष्टी व सततचा संत धारा अतिवृष्टी पाऊसामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरिप पिका बरोबर फळबाग शेतकऱ्यांचे फळ शेतीचे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती नुकसानीस पात्र असून फळबाग शेतकरी नुकसानग्रस्त चिंताग्रस्त झालेला आहे. या फळबागा नुकसान झालेल्या फळबाग पिकांचे त्वरित पंचनामे आदेश होणे बाबत अशी मागणी बार्शी तालुक्यातील महसूल मंडळातील फळबाग शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच सोलापूर जिल्हाधिकारी, बार्शी तहसीलदार यांच्याकडे बार्शी तालुका शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप शेती पिकांचे पंचनामे होत आहेत परंतु फळबाग शेतकऱ्यांची आपल्या स्तरावर संबंधितांनी स्वतःजातीने लक्ष घालून सदर निवेदनातील मागणीची पूर्तता करावी अन्यथा लोकशाही मार्गाने होणाऱ्या ग्रामस्थांच्या जन-आंदोलनास वाईट विपरीत परिणामामुळे होणाऱ्या हानी नुकसानीस सर्वस्वी संबंधित प्रशासन, मंत्री जबाबदार धरले जाईल याची नोंद घ्यावी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर यांनी दिला.