
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेने मंगळवारी शांतिसागर मंगल कार्यालयात शहरातील हिंदू पुरोहितांची सभा घेतली. या सभेत पुरोहितांनी भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निरीक्षक, नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधाकर कोहळे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांच्या उपस्थितीत शहरातील पुरोहित यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गोमाता, भूमाता व महिला या आपल्या तीन माता असल्याचे पुरोहितांनी सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी भाजप महायुतीचे उमेदवार राम आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच धर्म व संस्कृतीचे आपण काम करतो. त्यामुळे धर्म व संस्कृतीला प्राधान्य देणाऱ्या भाजप महायुतीच्या पाठीशी आपण उभे राहण्याचे गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच पाचशे वर्षांपासून तंबूत राहणाऱ्या श्री रामलल्लांसाठी भाजपने भव्य राम मंदिर उभारले. त्यात त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यामुळे भाजपला मतदान करू, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी देविदास यनगल, वेणुगोपाल मालपुरे, बालयोगी महाराज यांच्यासह शहरातील विविध मंदिर, मठातील हिंदू पुरोहित उपस्थित होते