मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय लवकर सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा, ABVP ची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य सरकारे आठ वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले होते. परंतु या विषयाचा पाठपुरावा झाला नसल्यामुळे मंजूर झालेले अभियांत्रिक महाविद्यालय अद्यापही सुरू झालेले नाही. याचा फटका अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आर्थिक परिस्थिती हालाकीचे असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क भरून खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागत आहे.
यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आणि टेक्स्टाईल अभ्यासक्रम सोलापूर शहरात सुरू करण्यासाठी सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून आपण शासनाकडे पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांना देण्यात आले. यावेळी प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के, जिल्हा संयोजक सौरभ कुलकर्णी, महानगर सहमंत्री श्रेयश सग्गम, महानगर सहमंत्री अनघा जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.