श्री स्वामी समर्थ महाराजांवर जेवढा माझा विश्वास तेवढाच राजकारणात देवेंद्र फडवणीस यांच्यावर विश्वास : देवेंद्र कोठे

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदार संघातून भाजपने युवा नेते देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचे पालकत्व स्वीकारले होते. तसेच कोठे यांनी देखील फडणवीसांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यापासून रोखले. मागील पाच महिन्यात त्यांनी महासेवा शिबिराच्या माध्यमातून मोर्चे बांधणी करत आपली ओळख निर्माण केली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाल्याने एकाच जिल्ह्यात काका पुतण्याला उमेदवारी मिळाली आहे. आता या मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर होतात कोठे यांच्या घरासमोर आणि त्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कोठे यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुविधा पत्नी आणि माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी त्यांना औक्षण केले. कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांचे मिरवणूक काढत कार्यालयापर्यंत आणले. एकंदरीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.