युवा भिमसेना संघटनेत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी, अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारी संघटना : महेश डोलारे

सोलापूर : प्रतिनिधी
युवा भिमसेना सामाजिक संघटनेची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत अनेकाची नियुक्ती करण्यात आली. यात वीरेंद्र भालचंद्र जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, विजयालक्ष्मी झाकणे महिला शहर संघटक, मुमताज अल्लाउद्दीन शेख महिला शहर खजिनदार,
अनिता जोनको महिला शहर उपाध्यक्ष, शकुंतला कट्टी म्हमाने महिला आघाडी शहर सचिव, जुबेर शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष, मुस्ताक शेख सोलापूर शहर वाहतूक उपाध्यक्ष, कौशल्या आय्यार महिला आघाडी विजापूर नाका विभाग अध्यक्ष, पूजा बबलू जांभळकर महिला आघाडी दक्षिण तालुकाध्यक्ष, अलीम शेख महिला जिल्हा उपाध्यक्ष, प्रकाश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष असे नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे बोलताना म्हणाले, शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ, लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार तळागाळात पोचवून अनेकाला न्याय देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करत आलेलं आहे आणि करत राहणार.
यावेळी उपस्थितीत विकास गायकवाड शहर उपाध्यक्ष, लिंगाप्पा रामपुरे, मल्लू कांबळे, राम कांबळे, मुमताज तांबोळी, सुनिता बेरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.