शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा दिला इशारा, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करा

सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या खरीप हंगामात निकृष्ट दर्जाचे बनावट खते, बियाणे, कीटकनाशक औषध इ.विक्री करून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली असून अशा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तसेच बहुतेक शेतकऱ्यांना लिंकिग साठी दुकानदार त्रास देतात, आवश्यक असलेल्या खतासोबत इतर अनावश्यक खते औषधे खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते अनावश्यक खत घेण्यास जर शेतकऱ्यांनी विरोध केला तर त्यांना शॉर्टींग च्या नावाखाली बरेच दुकानंदार आवश्यक खत नाकारतात किंवा पावती न देता जास्त रक्कम आकारून खते देतात अशा उत्तर सोलापूर तालुक्यातील तसेच सोलापूर शहरातील दुकानदारांना लेखी आदेश काढून ते तात्काळ थांबविण्यात यावेत. अन्यथा सामान्य शेतकऱ्यां च्या हित रक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या शिकवणी प्रमाणे व शिवसेना संपर्क प्रमुख अनील कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन योग्य तो धडा शिकविला जाईल. याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख संजय पौळ यांनी दिला आहे.
सदर प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य ती पाऊले उचण्यात येतील असे आश्वासन दिले त्याच बरोबर या विषयाशी निगडित असलेल्या सर्व संबंधिताची बैठक आयोजित करून आदेश देण्याचे नियोजन करण्यात येईल असेही यावेळी गवसाने यांनी सांगीतले. या वेळी उपतालुका प्रमुख अच्युतराव बाभळे, उपतालुका प्रमुख सचिन घोडके, विभागप्रमुख लक्ष्मण मुळे, उपविभागप्रमुख अरुण लोंढे, कवठे शाखाप्रमुख महेंद्र डोंबाळे, मोहोळ विधानसभा शिवदूत प्रशांत चव्हाण उपस्थित होते.