युवा सेनेची सोलापूर शहर आणि जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा सेनेकडून मोर्चेबांधणी

सोलापूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्हा युवा सेनेकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. युवा सेनेचे सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवा सेनेचे सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे तसेच युवा सेनेचे सोलापूर लोकसभा विस्तारक सिद्धाराम शिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पद्मशाली चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणीसुद्धा जाहीर करण्यात आली.
या बैठकीला युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, शहर प्रमुख विठ्ठल वानकर, शिवसेनेचे महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारमपुरी, विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड, जिल्हा सचिव मल्लिनाथ कारमपुरी, जिल्हा कॉलेज कक्ष अधिकारी तुषार आवताडे, जिल्हा सोशल मिडिया समन्वयक अजित स्वामी, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख आनंदकुमार थोरात तसेच शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
== सोलापूर शहर नूतन पदाधिकारी ==
जिल्हा समन्वयक सचिन हेगडे, जिल्हा कॉलेज कक्ष प्रमुख कार्यक्षेत्र विधानसभा अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर (ग्रामीण), अनिरुद्ध दहिवडे, कॉलेज कक्ष उपजिल्हा समन्वयक विजय मोटे, शहर चिटणीस अविनाश भोळे, उपशहर प्रमुख उत्तर विधानसभा शुभम घोलप आणि ओंकार बुरबुरे, दक्षिण विधानसभा धोंडीराम पवार विनोद घोडके आणि मध्य विधानसभा ज्ञानेश्वर खैरे
== सोलापूर ग्रामीण नूतन पदाधिकारी ==
तालुका युवा अधिकारी शंभू भोसले (सोलापूर शहर उत्तर विधानसभा कार्यक्षेत्र कोंडी आणि खेड), उपतालुका युवा अधिकारी उमर कटारे (अक्कलकोट विधानसभा), दक्षिण विधानसभा चिदानंद शेजाळे, आकाश लवटे, शाखा प्रमुख तेलगाव (म) बिराप्पा पुजारी, भंडारकवठे बाबुशा बोराळकर, कुसूर ओंकार चणेगाव, विंचूर- विनायक पाटील, शंकरनगर रोशन जाधव, बाळगी शिवपुत्र कस्तुरे, सादेपूर- मलकरीसिद्ध शेंडगे, उपशाखाप्रमुख पुंडलिक कोळी, धानेश उपसे, परमेश्वर चणेगाव, शावरसिद्ध पुजारी, राजकुमार राठोड, मोहित कुंभार, मळसिद्ध शेंडगे,