प्रभाग क्रमांक सात मध्ये १५ हजार मतांचा लिड देऊ, मतदारांनी दिली ग्वाही

सोलापूर : प्रतिनिधी
विरोधी पक्षाचे उमेदवार आमदार देशमुख यांच्यावर फक्त टीका करीत आहेत विकास कामाची कोणतीही कामे सांगता येत नाहीत मागील पाच वर्षात प्रभाग क्रमांक सात मधील अवंती नगर, निराळे वस्ती, अभिमान श्री, यश नगर इत्यादी परिसरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर येथील मतदार पंधरा हजार मतांचा लीड ग्वाही दिली असल्याची माहिती भाजपचे पवार यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ७ येथे भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे माहितीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी संपूर्ण भागात पदयात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं. जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी माता भगिनींच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांचे औक्षण करण्यात आले.
प्रभाग क्रमांक सात मधील आजची पदयात्रा प्रचाराची नसून विजयी मिरवणूकच आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य जनतेला खरा न्याय दिला आहे. आमदार देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पदयात्रेला मिळाला आहे. घरोघरी मिळणारा आशीर्वाद हाच देशमुखांच्या कामाची पावती आहे. विजय घासून नाही तर ठासून होईल अशी खात्री राष्ट्रवादीचे कदम यांनी यावेळी दिली.
या पदयात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, नाना मस्के, यांच्या मार्गदर्शनाखाली तर माजी नगरसेविका मंदाकिनी पवार, सुजित चौगुले, शिवसेना महिला प्रमुख जयश्री पवार, श्रीकांत घाडगे, भैय्या बनसोडे, सोमा कालेकर, सागर मोरे, राजाभाऊ निकम, प्रतीक्षा शहा, सुवर्णा शहा, श्रद्धा पवार, दिपाली पवार आदींचे पदयात्रेत प्रमुख उपस्थिती होती.