पत्रा तालीम मध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं, पत्रा तालीम आता एकत्र झाली मला भरघोस मतांनी निकडून देणार : महेश कोठे

सोलापूर : प्रतिनिधी
शहर उत्तर विधानसभेंचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पडयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग सात मध्ये देखील ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली, यानंतर पदयात्रा पत्रा तालीम, सळई मारुती, पंजाब तालीम, चौपाड, नवजवान गल्ली, माळी गल्ली, काळी मस्जिद, उमा नगरी, निराळी वस्ती, अवंती नगर, यश नगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली,
पदयात्रेत ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, पदयात्रेत हजारोंच्या संख्येने महिला, युवक सहभागी झाले होते,
पत्रा तालीम मध्ये भांडणे लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केले, पत्रा तालीम आता एक झाली आहे, संपूर्ण पत्रा तालीम आता माझ्यासोबत असून मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला
यावेळी पद्माकर नाना काळे, मनोहर सपाटे, सतीश कोल्हारकर, सुनीता रोटे, नलिनी चंदेले, यांच्यासह पत्रा तालीम मंडळाचे कार्यकर्ते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.