शहर- ग्रामीण भागात बैठकांचा धडाका, दक्षिण तालुका राज्यात विकासाचे मॉडेल करणार : आमदार सुभाष देशमुख

सोलापूर (प्रतिनिधी)
दक्षिण तालुक्याला राज्यात विकासाचे मॉडेल करण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत महायुती सरकार आल्यापासून दक्षिण मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे आणि यापुढेही मोठा निधी आणणार आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा महायुतीला साथ द्यावी आणि आपल्याला दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांचे शहर आणि ग्रामीण भागात झंझावती दौरे सोडून सुरू आहेत शहर आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी ते कॉर्नर बैठका आणि प्रचार सभा घेत आहेत.
उद्धव नगर,जुळे सोलापूर येथे कॉर्नर बैठक घेत येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समवेत संवाद साधत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी संदीप हेसे,गंगाधर कुलकर्णी, मुरंद पंपट, महेश देवकर,राहुल केदार परमेश्वर लोटकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
तिर्हे येथे बैठक घेत आ. देशमुख यांनी महायुती सरकारच्या कुणाल बद्दलची माहिती ग्रामस्थांना दिली महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी लाडके बहीण योजना सुरू करण्यात आली आहे याचा कोट्यवधी महिलांना लाभ मिळाला आहे त्यामुळे सर्व बहिणींचा आशीर्वाद माहिती आणि आपल्या पाठीमागे असल्याचे यावेळी सुभाष देशमुख म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष राम जाधव, शशिकांत पवार, प्रताप मल्लाव, संजय शिंदे, वृषाली पवार, राजकुमार मल्लाव,विक्रम कटुळे, अण्णा जावळे, घनश्याम पाटील, महेश पवार,नारायण गायकवाड, रावसाहेब गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड, समाधान गायकवाड, विशाल जाधव,गोपाळ सुरवसे,आकाश पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोजप्पा तांडा येथे बैठक घेत आ.देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ,यावेळी तालुकाध्यक्ष राम जाधव, ज्ञानेश्वर बबन बंडगर (ग्रामपंचायत सदस्य), विनोद नागनाथ राठोड (ग्रामपंचायत सदस्य), संगीता अनिल चव्हाण (ग्रामपंचायत सदस्य), रतन शंकर चव्हाण, गणेश रामू चव्हाण, सुभाष गोपीचंद पवार, आनंद शंकर चव्हाण, गुरुनाथ वालापा राठोड, नागनाथ तुकाराम राठोड, राजू तोळाराम चव्हाण, संतोष धेनू चव्हाण,भारत रेवापा राठोड, जनाबाई रामू चव्हाणउषा संतोष चव्हाण, सीमा पंकज राठोड,सुमन गुरनाथ राठोड, पूजा विनोद राठोड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.