कोल्हे-रसाळे आक्रमक दिला इशारा, प्रशासन लागले कामाला, सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या समितीची शमी वृक्षा जवळ पाहणी

सोलापूर : प्रतिनिधी
हिदुधर्म रुढीपरंपरे नुसार सीमोल्लंघनादिवशी निघणार्या मिरवणुकीवेळी सार्वजनिक मंडळ, मानाच्या काठी पालखीसह पार्क चौक येथील शमीवृक्षाला प्रदिक्षणा घालत असतात यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या संदर्भात मंडळाचे विश्वस्त तथा माजी उपमहापौर दिलिप कोल्हे आणि सुनिल रसाळे यांनी तात्काळ महापालिका च्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून जागेवर पाहणी करण्यासाठी बोलवले, अधिकारी देखील पाहणी करण्यासाठी आले. यावेळी दिलीप कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत ही कामे तात्काळ करून घ्यावीत अन्यथा दसऱ्या दिवशी घडणाऱ्या घटनेस महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला यावेळी अधिकाऱ्यांनीही तात्काळ कामे करून घेतली..
यासाठी आज रोजी महापालिकेचे झोन अधिकारी अंत्रोळीकर यांच्यासमवेत विद्युत विभागाचे मोरे, मंडळाचे विश्वस्त तथा माजी उपमहापौर दिलिप कोल्हे, सुनिल रसाळे, अशोक कलशेट्टी, संजय शिंदे, चक्रपाणी गज्जम, विजय पुकाळे, किसन गर्जे यांच्यासह महापालिकेचे अधिकाऱ्यांसोबत शमी वृक्ष परिसराची पाहणी करुन योग्य त्या सुचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले व तात्काळ कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली.