देशातील पहिल्या विधी सेवा चिकित्सालयाचे डॉ. वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उदघाटन
संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे, त्याचा वापर करा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम एस आजमी

सोलापूर : प्रतिनिधी.
समाजातील गोरगरीब व्यक्तीला विशेषता महिलांना आणि बालकांना मोफत विधी सेवा व सल्ला दिला जातो. परंतु एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात अशा प्रकारचे विधी सेवा चिकित्सालय सुरू करणारे डॉ. वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महा विद्यालय हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले ठरले असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलीम अजमी यांनी व्यक्त केले.
डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या मजल्यावर विकृतीशास्त्र विभागाशेजारी विधी सेवा चिकित्सालय कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती आजमी हे बोलत होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विधी सेवा चिकित्सालयाची सेवा वैद्यकीय महाविद्यालयात दर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत महिला विधी सहाय्यक यांच्यामार्फत सुरू राहणार आहे.
पुढे बोलताना न्यायाधीश आजमी म्हणाले की, संविधानाने प्रत्येकाला खूप अधिकार दिलेले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी महिला यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याकरिता अशा विधी प्राधिकरणाची गरज आहे. समाजामध्ये शोषण मोठ्या प्रमाणात होत असून केवळ कायद्याची माहिती नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. अनेक जण आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कनिष्ठथरातील कर्मचाऱ्यांचे शोषण करत आहेत. या त्यांच्या कृत्याला आळा घालण्याकरिता विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर म्हणाले की, विधी सेवा चिकित्सालय वैद्यकीय महा विद्यालयात सुरू करून न्यायाधीशानी राज्यातच नव्हे तर देशात सोलापूरचा नावलौकिक वाढविला आहे. दिवसभरच्या कामकाजाचा प्रत्येकाला ट्रेस असतो. तो दूर करण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने डिस्टर्ब न होता मेडिटेशन, व्यायाम, योगा, संगीत ऐकणे, चांगली झोप घेणे, हास्यविनोद करणे आणि सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश कटारिया होणे राणे मुख्य न्याय दंडाधिकारी श्री भंडारी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सलिंग सदस्य मिलिंद थोबडे, सोलापूर जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्ष शिंदे सचिव अमोल डॉ किंग उपाधिष्ठता डॉ जयकर डॉ जंजाळ डॉ बनसोडे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संपत्ती तोडकर, डॉ औदुंबर मस्के, डॉ राजेश चौगुले, डॉ अग्रजा चीटणीस, डॉ सुहास सरवदे व जिल्हा न्यायालयाचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री खिस्ते यांनी केले तर आभार डॉ. दंतकाळे यांनी मानले.