तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती सोलापुरातील सहा विधानसभा लढवणार : अजित कुलकर्णी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्हातील सहा विधानसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलाय. प्रहार पक्षाचे सोलापूर शहरअध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, आकलकोट, माढा, करमाळा आणि मंगळवेढा मतदार तिसऱ्या आघाडीकडून लढवण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीराजे, आमदार बच्चु कडू आणि राजू शेट्टी यांच्या माध्यमातून राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय निर्माण केला जात असून त्याच माध्यमातून सोलापूर शहर जिल्हातील सहा जागा लढवणार असल्याचे प्रहार पक्षाने जाहीर केले.
परिवर्तन महाशक्ती च्या बॅनर खाली तिसरी आघाडी एकत्र येत असून सोलापूर शहर जिल्हातील काही विद्यमान लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असून लवकरात प्रहारचे नेते बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार घोषित केले जातील अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष शहरअध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिली.