सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री पद मिळावे यासाठी विठ्ठलास साकडे
शिवसेनेच्या वतीने पंढरपुरात विठ्ठलाची महाआरती आणि वारकऱ्यांचे भजन

सोलापूर : प्रतिनिधी
एकीकडे मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना. दुसरीकडे पंढरपुरात शिवसेनेच्या महिला आघाडी यांच्या वतीने विठ्ठलाची महा आरती करत तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्यमंत्री करा असे साकडे विठ्ठलास घालण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन – कीर्तन करत आमच्या भावाला आरोग्यमंत्री करा अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात दिसून आले. त्यामुळे विस्तरापूर्विच तानाजी सावंत यांच्या आरोग्यमंत्री पदासाठी शिवसैनिक आणि महिला आग्रही असताना दिसत आहे.