शरद पवार उद्या मारकडवाडीला जाणार !

सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांवर बंदी का घालण्यात आली, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. निवडणूक संपली आहे, जर मारकडवाडी गावातील लोकांना काही संशय असेल आणि ते स्वतः मतदान घेऊन शहानिशा करत असतील तर बंदी घालण्याचे कारण काय, अशीही विचारणा पवार यांनी केली. दरम्यान पवार रविवारी मारकडवाडीला जाणार आहे. ते येथील गावकऱ्यांशी चर्चा करणार असून परिस्थिती जाणून घेणार आहेत.
शरद पवारांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सादर करत ईव्हीएमवर अप्रत्यक्ष संशय व्यक्त केला आहे. मतांची आकडेवारी बघितली की आश्चर्य वाटते, छोट्या राज्यात भाजपचा पराभव, मोठ्या राज्यात विजय होत आहे, यंदा काँग्रेसला 80 लाख मते मिळाली, पण जागा मात्र 17 मिळाल्या. तर अजित पवार गटाला 58 लाख मते व 41 जागा, तर शिवसेनेला 79 लाख मते मिळाली आणि त्यांनी 57 जागा जिंकल्या, असे पवार म्हणाले.