सोलापूरमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक
शशिकांत कांबळे यांची प्रदेश चिटणीसपदी पदी निवड, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिली प्रदेशवर संधी

सोलापूर : प्रतिनिधी
7 ऑक्टोंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुंबई येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी सोलापूर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष शशिकांत कांबळे यांची निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, मंत्री छगन भुजबळ यांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांनी दिलेला आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी राहील असे शशिकांत कांबळे यांनी सत्कारला उत्तर देताना म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री गरजे, समता परिषद सोलापूर शहर उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे सचिव अर्जुन माळी इत्यादी उपस्थित होते.