5 गोवंशाला कत्तलीपासुन जीवदान, सोलापुरात शेतकऱ्याच्या नावावर कत्तलीसाठी जनावराची खरेदी करुन वाहतूक करताना पकडले
आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा विभाग सोलापूर आणि अखिल भारतीय कृषी गोसेवा सोलापूर यांची कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा सोलापूर विभाग यांना गुप्त माहिती मिळाली होती ती सांगोला मार्गे काही नंदीवाले कत्तलीसाठी जनावरे घेऊन येणार आहेत त्यानुसार त्यांनी पोलिसाना कळवून पोलिसाच्या मदतीने सापळा रचला व ती गाडी बाळे पुलावर पकडण्यात आली.
त्यावेळेला ती माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघ चे गोरक्षक सुधीरभाऊ बहिरवाडे यांना कळाली असता ते सुद्धा तिथे ठिकाणावर पोहचले. त्यानुसार पोलिसाच्या मदतीने फौजदार चावडी येथे गाडी आणण्यात आली व फौजदार चावडिचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना सुधीर बहिरवाडे यांनी पटवून दिले हे कशाप्रकारे नंदीवाले कसाईना साथ देतात. त्या वेळेला ते त्यांना पटले आणि लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ती सर्व जनावरे अहिंसा गोशाळेत गाई व बैल सोडण्यात आले.
ही कारवाई यशस्वी करण्याकरिता आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा विभाग, सोलापूर अखिल भारतीय कृषी गोसेवा सोलापूर यांचे सहकार्य लाभले. गोरक्षक प्रवीण इंगल, पवन जगताप, प्रसाद झेडंगे, अभिजीत जाधव अभि आडगळे, श्री चव्हाण अनेक गोरक्षकांचे व तसेच फौजदार चावडी पोलिसांचे सहकार्य लाभले.