महापालिका मलेरिया विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त केली मिठाई वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुर महानगरपालिका मलेरिया विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य लेखावित्त अधिकारी डॉ रत्नराज जवळगेकर, जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट, सुपर वायझर गणेश माने, जहुर यादगिर, सादिक शेख, श्रीनिवास कोंडा, दिगंबर यरझल, मलेरिया विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ रत्नराज जवळगेकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातींचे स्वराज्य याबाबत माहिती दिली.
यावेळी कर्मचारी परमेश्वर कसबे, दत्ता शिंगे, सुशिल सुरवसे, सिद्धेश्वर सावंत, युवराज बनसोडे, अख्तर शेख, अब्दुल इनामदार, नितीन तळभडारे, तिमप्पा भैरे, योगेश माने, बाबु टोणपे, भिमा रोकडे, विष्णु भालेराव, मल्हारी गायकवाड, अंजन गोन्याल, अब्दुल शेख, संजय सरवदे, शरद लोंढे, राजु अलकुटे, महिंद्र भिडे, कैलास गायकवाड, प्रताप उघडे, विजय पवार, गुरूशांत वाले, युवराज पोटफोडे आदी कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले तर आभार सुभाष सुरवसे यांनी मानले.