हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करून राजू खरे यांना निवडून द्या : काका साठे

सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू खरे यांच्या प्रचारार्थ हिप्परगा येथील महादेव मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांची संयुक्त विद्यमाने बैठक घेण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते रतिकांत पाटील यांच्या प्रमुख प्रयत्नातून ही बैठक संपन्न झाली या बैठकीला प्रमुख उपस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर, युवा नेते जयदीप साठे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष किसन पाटोळे, काँग्रेसचे लक्ष्मण भोसले, मारुती भोसले, नंदा कांबळे, लहू पाटोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना नेते प्रकाश वानकर यांनी भाजपवर टीका करत भाजपने आणलेला योजना या फसव्या आहेत, सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे हाल भाजप काळात झाले, त्यामुळे महायुतीला गाडून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आव्हान त्यांनी केले.
लाडकी बहीण योजना ही महिलांना मदत नसून ते एक आमिष आहे. महायुतीला मतदान पडावे यासाठी तात्पुरत्या स्वरूपात योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी भाजपने कोणतेही योजना आणल्या नाहीत त्यांनी नागरिकांना फसवण्याचे काम केले. अशा हुकूमशाह भाजपाला घरी बसून महाविकास आघाडीला मतदान करून राजू खरे यांना निवडून आणण्याचे आवाहन काका साठे यांनी केले.
यावेळी तळे हिप्परागा सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी अभिजीत पाटील यांनी उत्कृष्ट प्रस्तावना केले तर आभार प्रदर्शन मारुती भोसले यांनी केले.