महाराष्ट्र
“मुद्द्याचं बोलतोय, कान देऊन ऐक जरा”, आमदार राम सातपुते यांचे रॅप सॉंग होत आहे व्हायरल
"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाय", त्याच त्याच मुद्द्यावर मत मागणार किती?, असे म्हणत सोलापूर शहराच्या विकासाचा पाढा रॅप सॉंग मधून वाचला

सोलापूर : प्रतिनिधी
भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ हे रॅप सॉंग तयार करण्यात आले आहे. ते सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची या रॅप सॉंगला पसंती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने केलेली कामे, आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेत केलेली भरीव कामे यांवर आधारित हे रॅप सॉंग आहे. सोशल मीडिया मधून हे रॅप सॉंग मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे.