छत्रपती ग्रुप अवंती नगर यांच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त महाप्रसाद वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अवंती नगर येथील छत्रपती ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
शहर उत्तरचे विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. श्री गणेश विठ्ठल मंदिरास पत्रा शेड दिल्या निमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांचा ट्रस्टी अध्यक्ष सुनील रसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचे वाटप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती ग्रुप अवंती नगर यांच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला हा महाप्रसाद वाटपाचा संपूर्ण खर्च छत्रपती ग्रुपचे संस्थापक यशवंत रसाळे यांच्या नेतृत्वात युवराज रसाळे, प्रमोद बाबर, सोमा कालेकर यांनी केला होता. यावेळी छत्रपती ग्रुप आणि श्री गणेश विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.