पालिकेच्या 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही व बसू ही देणार नाही : कामगार नेते बापूसाहेब सदाफुले

सोलापूर : प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमपा मधील विविध संवर्गातील २४९ बदली रोजंदारी सेवेत कायम करण्यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर यांची समक्ष भेट घेऊन केली चर्चा.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा राज्याचे निमंत्रक विश्वास काटकर हे अचानक सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी सोमपा मधील विविध संवर्गातील २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात समक्ष भेट घेऊन या कर्मचाऱ्यांवर २५ ते ३० वर्ष अन्याय झाल्याचे निदर्शनास आणून दिले व सन २००५ पासुन सेवेत कायम झालेल्या व २००८ मधील कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन कसे लागू करता येईल तसेच सोमपा मधील आरोग्य निरीक्षक यांच्या वाहतूक भत्त्यामध्ये शासनाच्या नियमा नुसार वाढ झाली पाहिजे सोमपा मधील लिपीक हा लिपिकच नाही राहिला पाहिजे तो वरील पदावर गेला पाहिजे अशा अनेक कर्मचाऱ्यांचे विषयावर यावेळी चर्चा केली.
यावेळी राज्याचे सरचिटणीस काटकर यांनी सोमपा मधील २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात भविष्यामध्ये महाराष्ट्रात कोणाचेही सरकार येऊ द्या राज्य मध्यवर्ती संघटनेची ज्यावेळेस पहिली बैठक शासन, प्रशासनाबरोबर लागेल त्यावेळेस ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत राज्याचे प्रधान सचिव यांना बैठकीचे निमंत्रण दिलं जाईल व हा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही शासन प्रशासनाच्या बैठकीत आवाज उठवला जाईल असे आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी खजिनदार अरुण मेत्रे, प्रमुख संघटक सुनील शिंदे, बिबीशन गायकवाड, श्रीकांत भंडारे व राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड, खंडू भोसले, नितीन कसबे, अविनाश गोडसे, राजीव साळुंखे, नितीन कसबे, मंजुनाथ गायकवाड, रवी नष्टे, अमृत कोकाटे, विवेक लिंगराज, अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.