सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
”स्वराज्य संग्राम” या पक्षास महायुतीत घटक पक्ष म्हणून सामील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत

सोलापूर : प्रतिनिधी (मुंबई)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील आयोजित सभेत ”स्वराज्य संग्राम” या पक्षास महायुतीत घटक पक्ष म्हणून सामील करून घेतले.
स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांचे नेतृत्वाखाली स्वराज्य संग्राम चे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास मा. आ. दिलीप लांडे, स्वराज्य संग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष सर्वश्री उदय आंबोनकर, अनंतराव देशमुख, अजित बानगुडे, सचिव विशाल जाधव, यांचे सह ठाण्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे, उपाध्यक्ष अजित सिंह आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.