बेडर समाजाचा विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचा मेळावा उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेडर समाजाच्यावतीने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (ए) महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा श्री नीलकंठेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहात झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख, बाबूराव जमादार, भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, बेडर समाजाचे नेते शामराव धुरी, अभियंता उमेश जमादार, मल्लिकार्जुन सातार्ले, अनिल कामाठी, बसवराज गुजले, शशिकांत जेनुरे, राजू तलाठी, शरणाप्पा टणकेदार, मोहन मानवी, नागेश डोंगरे, महेश तलाटी, दीपक मुत्ता, संतोष माने, राजू मलूरे, आनंद गुजले उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज, महर्षी वाल्मिकी महाराज, संत शिवभक्त कन्नप्पा महाराज, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बाबूराव जमादार, भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, बेडर समाजाचे नेते शामराव धुरी, अभियंता उमेश जमादार आदींनी मनोगतात समाजाच्या मागण्या भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केल्या. तसेच यावेळी बेडर समाजाच्यावतीने समाजाच्या विविध मागण्यांसह पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे व प्रश्न सोडवण्याचे अभिवचन बेडर समाज बांधवांना दिले.
बाबूराव जमादार यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर राजकुमार माने यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि कावळे, संदीप विजापूरे, सुधाकर बेडसुर आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. समाज मेळाव्यास सोलापूर शहर उत्तर मधील भवानी पेठ, मड्डी वस्ती, जुना पुणे नाका, शिवाजी नगर, बाळे स्टेशन, अमराई वस्ती, शेटे वस्ती, दमाणी नगर, गणेश नगर, मडकी वस्ती, बल्लारी चाळ, जुना विडी घरकुल, सरवदे नगर, बाळीवेस वडार गल्ली, जम्मा वस्ती, साखर पेठ आदीसह सर्वच भागातील बेडर समाज मोठ्या संख्येने मेळाव्यास एकवटला होता.
भगवान महादेवांच्या मूर्तीसमोर मोठी कमळाची छबी असलेल्या रांगोळीवरील बेडर समाज एकसंघ आमदार विजय मालक संग या वाक्यासह सदर मेळाव्यात स्वागतपर रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.