पैलवान व फारुखभाई एकत्र, मध्य विधानसभेचे बदलणार चित्र, पंजाब तालमीने घडवला मिलाप.?

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या निवडून येत खासदार झाल्या. निवडणुकीच्या दरम्यान मतदानावेळी शहरातील वातावरण हे हिंदू मुस्लिम कडे वळल्याच चित्र पहावयास मिळाल होता. यावरून मुस्लिम समाजाने शंभर टक्के मतदान काँग्रेसला केल्याचा दावा मुस्लिम समाजातील नेत्यांनी केला. काँग्रेस मधील मुस्लिम समाजाचे नेते एकत्र येत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कडे काँग्रेस मध्यची उमेदवारी मुस्लिम समाजातील व्यक्तीला मागितली. भाजप विरोधात मुस्लिम समाज एक झाल्याचं चित्र शहरात दिसून आलं. याचा फायदा आपल्याला व्हावा यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे आमदारकी, नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करत असताना पहावयास मिळत आहेत.
अशीच घटना एका सामाजिक कार्यक्रमात घडली, इस्लामिक नववर्षा निमित्त पंजाब तालमीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून एमआयएम पक्षाचे प्रमुख फारूक शाब्दी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तोफिक शेख यांची होती. दोन्ही प्रमुख नेते हे शहर मध्य मध्ये आमदारकीसाठी इच्छुक आहेत.
इस्लामिक नववर्षानिमित्त शुभेच्छा देताना तोफिक शेख म्हणाले MIM पक्षाकडून देखील नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या इतकेच काय तर एमआयएम पक्षाचे प्रमुख फारुक शाब्दि यांनी एक पाऊल पुढे जात भाजपकडून देखील नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंदाच्या वेळेस मुस्लिम समाजाचा आमदार व्हावा यासाठी समाज एकत्र येत असताना दिसत असला तरी हे दोन्ही नेते कार्यक्रमाला जर एकत्र आले, तरी मनाने आणि विचाराने कधी एकत्र येणार याची चर्चा मात्र कार्यक्रमात रंगली होती.
दोन नेत्यांमधील शाब्दिक कलगीतुरा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे. या दोन नेत्यांच्या मैत्रीपूर्ण भेटीने सोलापूर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधान आले आहे.