पालिकेच्या कोंडवाडा विभागातील गैरकारभाराचा बजरंग दल गोरक्षकांनी केला पर्दाफाश

सोलापूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत नंदी महाराजांना कसायांच्या दावणीला बांधणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाचा जाहीर निषेध हे निषेध व्यक्त करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पुनम गेट येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची सुरुवात बजरंग दलाच्या घोषणांनी करण्यात आली तद्नंतर सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला व तसेच संघटनेच्या वरिष्ठांनी घडलेल्या घटनेबाबत आपापले मनोगत देखील व्यक्त केले.
31 डिसेंबर 2024 रोजी जुना विडी घरकुल भागातील सागर चौक येथून एक कंकरेज जातीचे नंदी सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मोकाट फिरत असताना गाडीत भरून नेले. तद्नंतर दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी बजरंग दलातील गोरक्षकांनी त्या नंदीची विचारपूस करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले मॅडम यांच्याकडे गेले असता. त्यांनी आम्हाला हा विभाग अतिरिक्त आयुक्त तैमुर मुलाणी यांच्याकडे येतो असे सांगितले त्या आधारावर आम्ही अतिरिक्त आयुक्त/ कोंडवाडा अधीक्षक तैमूर मुलाणी यांच्याकडे गेलो असता. त्यांनी सदर घटनेची चौकशी करून तुम्हाला मी मंगळवार पर्यंत योग्य ते उत्तर देईन असा समज देऊन पाठवले. पुन्हा आम्ही मंगळवारी अतिरिक्त आयुक्त/ कोंडवाडा अधीक्षक तैमुर मुलाणी यांच्याकडे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी गेलो असता तेव्हा मात्र त्यांनी टाळाटाळ करून उडवा उडवीची उत्तरे दिली.
तद्नंतर त्यांनी कोंडवाडा प्रमुख मल्लिनाथ तोडकर यांना बोलावून घेतले कोंडवाडा प्रमुखांनी देखील मान्य केले की मी त्या गोवंश मालकाचे कुठल्याही प्रकारचे पुरावे न घेता सदरील गोवंश हे मी त्यांच्या स्वाधीन केले ही माझी चूक झाली अशी चूक पुन्हा होणार नाही म्हणून त्यांनी कबुली दिली. त्याच वेळेस बजरंग दलातील गोरक्षकांनी कोंडवाडा अधिकारी मल्लिनाथ तोडकर यांच्याकडे आणखीन एकमागणी केली की तुम्ही ज्या व्यक्तीला ते कंकरेज जातीचे नंदीबैल दिले आहे त्या व्यक्तीला महापालिकेत बोलवा असे म्हटल्यानंतर त्यांनी इनामदार नामक व्यक्तीला समोर बोलावून घेतले. त्या व्यक्तीला पाहताक्षणी बजरंग दलातील गोरक्षकांच्या असे लक्षात आले की या व्यक्तीवर 22 मार्च 2024 रोजी हैदराबाद रोड येथे टाटा मरीन गाडी मधून अवैधरीत्या गोवंश तस्करी करीत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. असे असताना देखील कोंडवाडा विभागाने तो कंकरेज जातीचा नंदीबैल एका कसायाच्या स्वाधीन केलाच कसा असा प्रश्न आम्हा बजरंग दलातील गोरक्षकांना सतत भेडसावत आहे याच प्रश्नाची दाद मागण्यासाठी आज आम्ही सर्व बजरंग दलातील पदाधिकारी, गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पुनम गेट जिल्हा परिषद येथे ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलन प्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, बजरंग दल जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख शितल परदेशी, बजरंग दल जिल्हा सह गोरक्षा प्रमुख पवनकुमार कोमटी, एल. आर. जी प्रतिष्ठानचे सतीश सिरसिल्ला, हिंदू जन जागृती समितीचे संदीप ढगे आदींची उपस्थिती होती.