अक्कलकोट विधानसभेसाठी प्रहारच्या जमीर शेख यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सोलापूर : प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या महत्त्वाच्या अशा मतदारसंघ असणारा अक्कलकोट मतदार संघात आज शेवटच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून अनेकांना धक्का दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढवणार असे गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते पण शेवटच्या दिवसापर्यंत प्रहार च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने अक्कलकोट शहर आणि तालुक्यात चर्चेला उधाण आले होते. खरोखरच प्रहार जनशक्ती पक्ष अक्कलकोट विधानसभा लढणार का हा प्रश्न अनेकांना पडलेला असताना आज अचानक प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपर्कप्रमुख जमीर शेख यांनी अनेक वाहनांचा ताफा घेऊन येऊन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर देण्यासाठी येथून शड्डू ठोकला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि तत्कालीन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना तगडे आवाहन उभा करणार असल्याचे याप्रसंगी जमीर शेख यांनी सांगितले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारी भरताना प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, शहर कार्यकारी अध्यक्ष खालीद मनियार, मुदससर शेख, फैसल सालार, अयाज बांगी आदी उपस्थित होते.