प्रत्येक रुग्णांना मोफत व उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
अद्ययावत उपकरण व सुसज्ज ऑपरेशन थिएटर सह सज्ज.

सोलापूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या सदर बाझार परिसरातील दाराशा प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे व बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून सुमारे १ कोटी रुपयांच्या तरतुदी मधून दाराशा प्रसूतिगृहाचे दुरुस्ती, नूतनीकरण तसेच अद्ययावत उपकरण सुविधा याद्वारे करण्यात आल्या आहेत. सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसुती कक्ष,वॉर्ड, तपासणी कक्ष, हिरकणी कक्ष, प्रयोगशाळा, सोनोग्राफी कक्ष, प्रतीक्षालय यातील सोयी सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
सदर बाझार परिसरातील कामगार वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महानगरपालिका आरोग्य विभागाचे दाराशा प्रसूतिगृह आजपासून मोफत प्रसूतीपूर्व व प्रसूतिपश्चात सुविधा देण्याकरिता सज्ज झाले आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या गरोदर महिलांना रक्त तपासणी, औषधे, ॲडमिशन,रक्त संक्रमण जेवण तसेच घरून ने – आण करण्याकरिता अँब्युलन्स या सर्व सुविधा मोफत देण्यात येतील. तसेच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यांचा देखील लाभ मिळणार आहे.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी राम रेड्डी यांच्या बालाजी अमाइन्स यांचे सामाजिक उत्तरदायित्व चमूचे कौतुक केले आणि आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांकरिता बालाजी अमाइन्स यांची टीम सातत्याने सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यात कार्यरत असल्याचे नमूद केले.
आयुक्त यांनी दाराशा प्रसुतिगृहातील सुविधांची पाहणी केली व उपस्थिती नागरिकांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी यांनी यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाचे नूतनीकरण केले होते आणि सध्या तेथे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा पाहून त्याबद्दल सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले. त्यामुळेच यावर्षी दाराशा या दुसऱ्या प्रसूतिगृहाचे देखील नुतनीकरण करून आज त्याच्या लोकार्पण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्य करण्याचा मानस जाहीर केला.
या प्रसूतिगृहाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण साठी बालाजी अमाईन्स तर्फे श्री कनशेट्टी, श्री बिराजदार, श्री सांजेकर यांच्या टीमने मेहनत घेतली होती त्यांचा सत्कार याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. सदर लोकार्पण सोहळाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, अनिल विपत, आरोग्याधिकारी डॉ.राखी माने, विभागीय अधिकारी हिदयात मुजावर, नागनाथ बाबर, महेश क्षीरसागर, श्री जगधनी, अंतर्गत लेखापापरीक्षक राहुल कुलकर्णी, युवराज गाडेकर, किशोर सातपुते, स्त्रीरोग तज्ञ डॉ.रेणुका लहांडे, बाल रोगतज्ञ डॉ.मंजुषा चाफळकर,
भूलतज्ञ डॉ. चिडगुपकर, डॉ सतीश दोशी, डॉ.विजयकुमार चौगुले, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अतिश बोराडे, डॉ.सुहासिनी वाळवेकर, डॉ.लता पाटील, डॉ. तन्वांगी जोग, मल्लीनाथ बिराजदार, दत्तप्रसाद सांजेकर, विनोद चुगे,असीम सिंदगी, अमोल कनशेट्टी, सचिन मोरे,बसवराज अंटद, उद्यान प्रमुख किरण जगदाळे, डॉ सतीश चौगुले,विक्रम पाटील,मेट्रन थोरात, मेट्रन माने, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, महानगरपालिकेच्या इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.