सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

दक्षिण मध्ये परिवर्तन विकास आघाडी चमत्कार घडवणार, महायुती व महाविकास आघाडीला धक्का देणार.?, युवराज राठोड यांचा पुढाकार

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये चुरस पहावयाला मिळत आहे. प्रत्येक पक्षामधून दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत विद्यमान आमदार, माजी आमदार, मागील वर्षी ज्यांनी उमेदवारी मागे घेतली, यंदाच्या वर्षी इच्छुक असणारे, देखील तयारीला लागले आहेत.

दक्षिण विधानसभा मतदार संघात देखील यंदाच्या वर्षी चांगली लढत देण्यासाठी मतदारसंघातील ज्येष्ठ आणि युवा नेते एकत्र येत त्यांनी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली.

महायुती व महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी, स्थानिक उमेदवाराला न्याय मिळावा यासह दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन आघाडी निर्माण झाली.

निमंत्रकाची भुमिका सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड हे करीत आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ही आघाडी तग धरली आणि लढलीच तर कोणाला धक्का देणार? अशी चर्चा सुरू आहे.

याआघाडीमध्ये ‘सोनाई’चे युवराज राठोड, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सत्तुबर, ‘बीआरएस’चे सचिन सोनटक्के,

आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक अमोल कारंडे, राजू चव्हाण, शेतकरी संघटनेचे अख्तरताज पाटील, चिदानंद सुंटे, माजी उपमहापौर राजेश काळे यांच्यासह राजेश्री चव्हाण, अमित अजनाळकर, प्रशांत वायकस्कर,

तुकाराम शेंडगे, सुरेश डवले, अजित सोनकटले, कपिल कोळी, फिरोज पटेल आदींनी याकामी मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत.

विधानसभेच्या नावाची एकमत करण्यावर यांच्यात आजच्या घडीला तरी भर राहिला आहे. कोणीही उमेदवार म्हणून पुढे आला तरी तन मन धनाने लढण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेस, भाजप, दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी गटातील नाराजांना आपल्या कळपात ओढण्यासाठी यांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामीण भागातील आजी आणि सरपंच, उपसरपंचासह विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्षांशी संपर्क साधत त्यांचेही भुमिपुत्राबद्दल मत आजमावून घेत आहेत.

काँग्रेसचे एक माजी जिल्हाध्यक्ष, अजित पवार गटाचे माजी नियोजन समितीचे सदस्य, मागील वेळच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून शेवटच्या क्षणी रिंगणातून बाहेर पडलेले यांसह इतर काही मंडळी ‘परिवर्तन’ वाल्यांच्या संपर्कात आहेत.

या ‘परिवर्तन’च्या माध्यमातून मराठा, लिंगायत, धनगर, अल्पसंख्याक, बंजारा, आणि बहुजन समाजाची होत असलेली ही वज्रमुठ कोणाला धक्का देणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!