ग्रामस्थांची हळहळ.. गुळवंची येथे विजेच्या धक्क्याने 24 म्हशीचा मृत्यू, संबंधितास शासकीय मदत देण्याची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास 24 म्हशींचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या म्हशीची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थातून केली जात आहे.
गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या 24 म्हशी होत्या. गुरुवारी त्या नेहमी प्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती. त्यामुळे ओड्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता. याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण झाल्या होत्या.
हे लक्षात येतात भजनावळे यांनी उर्वरित म्हशींना त्या पाण्यात जाण्या पासून रोखले त्यामुळे त्या चार म्हशी चा जीव वाचला आहे. या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती मधून या संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे.