सोलापूरमहाराष्ट्रशेतीसामाजिक
बार्शी सोलापूर रोडवरील शेतकऱ्यांच्या शेतातील प्लास्टिकला लागली आग, 10 किमी अंतरावरून दिसत होते धुराचे लोट

सोलापूर : प्रतिनिधी
बार्शी सोलापूर रोड च्या आतील बाजूस स्वामीनारायण मंदिरा शेजारी, खुणे यांची कडबा कुट्टी आहे. त्या कुट्टी शेजारी प्लास्टिक चा मोठा ढीग होता. त्या ढिगाला भीषण आग लागली. बार्शी शहराच्या बाहेर 10 किमी अंतरावरून धुराचे मोठे लोट दिसत होते. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन ला संपर्क केला. बार्शी नगर परिषद अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी नाही.